हरियाणाची चटपटीत बेसन मसाला रोटी : (besan masala roti recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#उत्तरभारत
#हरियाणा
#हरियाणाबेसनमसालारोटी
हरियाणाच्या खाण्यापिण्यात साधेपणा दिसून येतो. इथले लोक भाताच्या तुलनेत स्वादिष्ट आणि पौष्टीक रोटीला (पोळीला) पसंद करतात. ह्याच्या सोबतच हरियाणात दुधाचे उत्पादन जास्त होते , त्यामुळे जास्त करून इथल्या पदार्थांमध्ये दूध आणि दह्याचा जास्त वापर केला जातो. तर चला आज आपण करूयात हरियाणाची चटपटीत बेसन मसाला रोटी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीट
3 मेंबर्स
  1. साहित्य :
  2. 1 कपबेसन
  3. 1 1/2 कपगहू पीठ
  4. 1/2 टीस्पूनहळद पावडर
  5. 1 टीस्पूनओवा
  6. नमक
  7. 1/2 कपदही
  8. मसाला बनविण्यासाठी साहित्य :
  9. 11/2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  10. 1 टीस्पूनधने पावडर
  11. 1 टीस्पूनजीरा पावडर
  12. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  13. 1+1/2 टेबलस्पून साजूक तूप

कुकिंग सूचना

30 मिनीट
  1. 1

    स्टेप १: प्रथम एका परातीत बेसन,गहू पीठ,हळद ओवा मीठ मिक्स करून गोळा मळून घ्या आणि गोळा तयार

  2. 2

    स्टेप २: मसाला भरण्यासाठी वरील तिखट, जीरे,धने,आमचूर पावडर आणि साजूक तूप भरून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  3. 3

    स्टेप 3: गोळ्याला चुरून घ्या.त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. त्यातला एक छोटा गोळा घ्या आणि पुरी सारखा लाटून घ्या.आता त्या लाटलेल्या पुरी सारख्या पोळीला तयार केलेला मसाला लावा आणि मधून पोळीला मोडून घ्या व त्यावर पुन्हा मसाला लावून त्रिकोणी घडी घालावी आणि त्रिकोणी पराठा (दुपोडी पोळी, दोन घडीच्या) पोळी सारखी लाटून मोठी करावी. सगळीकडे सारखीच जाड लाटली गेली पाहिजे.

  4. 4

    स्टेप 4: आता तवा गरम करा मसाला रोटी भाजण्यासाठी तवा मध्यम तापलेला हवा. कमी तापला तर पोळीच्या खालचा भाग कडक होऊ लागेल. आता मसाला रोटी तव्यावर शेकण्यासाठी टाका थोड्या वेळाने दोन्ही कडून शेकल्यानंतर मसाला रोटीला तूप लावून शेकून घ्या.

  5. 5

    स्टेप ५: असेच सर्व मसाला रोटी बनवून ग्रेवी वाली भाजी,लोणच्या किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

Similar Recipes