खान्देशी होळी स्पेशल कढी फूनके (kadhi phunke recipe in marathi)

Vaishali Dipak Patil
Vaishali Dipak Patil @vaishu

#hr उत्तर महाराष्ट्र म्हणजे खान्देश या भागात होळी पौर्णिमा या सणाला कढी फूनके बनवून हा नैवद्य होळीला दाखवतात.

खान्देशी होळी स्पेशल कढी फूनके (kadhi phunke recipe in marathi)

#hr उत्तर महाराष्ट्र म्हणजे खान्देश या भागात होळी पौर्णिमा या सणाला कढी फूनके बनवून हा नैवद्य होळीला दाखवतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मी.
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतूरदाळ
  2. 1/2 वाटीचना डाळ
  3. 1/2 वाटीचवळी /डाळ
  4. 1/2 वाटीमटकी डाळ
  5. मीठ चवीनुसार
  6. 6-7हिरव्या मिरच्या
  7. 15-20लसूण पाकळ्या
  8. 1 चमचाजीरे
  9. 1/2 चमचाहळद
  10. वाटीबारीक कापलेली कोथिंबीर मोठी
  11. 1 वाटीकढी साठी दही
  12. 2 चमचेडाळीचे पीठ
  13. 2हिरवी मिरची
  14. कोथिंबीर बारीक
  15. जीरे मोहरी
  16. हळद
  17. 1 टीस्पूनलाल तिखट
  18. मीठ चवीनुसार
  19. तेल
  20. 5-6लसूण पाकळ्या
  21. आले लसूण पेस्ट इ

कुकिंग सूचना

40मी.
  1. 1

    सर्वप्रथम सर्व दाळी साफ करून स्वच्छ धुवून घ्या आणि 4ते 5तास भिजवून घ्यावे.

  2. 2

    आता भिजलेल्या सर्व दाळी मिक्सर मध्ये वाटून घेऊ या. मिक्सरच्या भांड्यात 5ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जीरे घालून वाटून घेऊ. या वाटणात हळद, मीठ चवीनुसार तिखट आवडी प्रमाणे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण मिक्स करुन घेऊ.

  3. 3

    आता एका कढईत पाणी तापवुन त्यावर चाळणी ठेऊन त्या चाळणीत फुंनके बनवून घेऊ.

  4. 4

    चाळणीवर झाकण ठेवून10ते15मी. मध्यम आचेवर फुंनके वाफेऊन घेऊ. फुंनके छान शिजून तयार आहेत मस्त गरम गरम कढी सोबत सर्व्ह करावे.

  5. 5

    कढी साठी दही मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे त्यात थोडे पाणी घालून डाळीचं पीठ, मीठ चवीनुसार,घालून मिक्स करावे

  6. 6

    एका कढईत थोडे तेल तापवून त्यात कापलेली हिरवी मिरची, जीरे, मोहरी हळद घालावी, थोडा कढीपत्ता, आले लसूण पेस्ट, लसणाचे बारीक काप इ. घालून फोडणी करून घ्यावी त्यात ताक घालावे व छान शिजवून घ्यावे.

  7. 7

    वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कढी फुंक्यानसोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Dipak Patil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes