ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

ब्रेड रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज.
मी प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
खूप छान झाला ब्रेडचा उपमा. मी साधा ब्रेडच वापरला आहे.
मी नेहमी करते,त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालत नाही.

ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)

ब्रेड रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज.
मी प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
खूप छान झाला ब्रेडचा उपमा. मी साधा ब्रेडच वापरला आहे.
मी नेहमी करते,त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 8-10ब्रेडचे स्लाइस
  2. 1मोठा कांदा
  3. 1 लहानटोमॅटो
  4. 1 लहानसिमला मिरची
  5. 3-4हिरव्या मिरच्या
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1/2 टीस्पूनजीरे-मोहरी
  8. 7-8कढीपत्त्याची पाने
  9. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 1/4 टीस्पूनमीठ
  13. चिमूटभरसाखर
  14. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  15. कोथिंबीर, शेव

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    ब्रेड चे सुरीने चौकोनी बारीक तुकडे करून घ्यावे.

  2. 2

    कांदा, टोमॅटो, सिमला मिरची बारीक चिरून घ्यावेत.गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे. तेल तापले की त्यात जीरे-मोहरी, हिंग घालावे.

  3. 3

    कढीपत्ता, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या घालून परतणे. नंतर कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा.नंतर टोमॅटो व सिमला मिरची घालून परतवून घेणे भिजवून.

  4. 4

    लाल तिखट, हळद, घालून परतवून घेणे. नंतर मीठ व साखर घालून परतवून घेणे.

  5. 5

    नंतर ब्रेड चे तुकडे घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करून घेणे व झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी व गॅस बंद करावा.

  6. 6

    वरून कोथिंबीर, लिंबाचा रस व आवडत असल्यास शेव घालून घेणे.माझ्याकडे शेव व कोथिंबीर नव्हती म्हणून मी घातली नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes