शेवपुरी (sev puri recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

शेवपुरी (sev puri recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबारीक रवा
  2. 1/4 कपमैदा
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. मीठ चवीनुसार
  5. 2 टेबलस्पूनहिरवी चटणी
  6. 2 टेबलस्पूनगोड चटणी
  7. 2उकडलेले बटाटे
  8. 1कांदा बारीक चिरून
  9. 1टोमॅटो बारीक चिरून
  10. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  11. 1/4 कपबारीक शेव
  12. 1 टीस्पूनचाट मसाला
  13. 1 टीस्पूनकाळ मीठ
  14. तेल पुरी तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बाऊलमधे रवा, मैदा, मीठ घालून मिक्स करा. तेलाचे मोहन घालून मिक्स करावे.गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.

  2. 2

    तयार पिठाचा गोळा घेऊन चपाती लाटून घ्या. डब्याच्या ढक्कनच्या साह्याने गोलाकार पुऱ्या लाटून त्यावर काट्या चमच्याने टोचे मारुन घ्या.

  3. 3

    कढईत तेल गरम करून पुऱ्या तळून घ्या.

  4. 4

    शेवपुरी साठी सर्व साहित्य तयार करून घ्या. कांदा,टोमॅटो,कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  5. 5

    प्लेट मध्ये पुऱ्या घेऊन त्या वर कांदा, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर घालावी.
    चाट मसाला, काळमीठ,गोड चटणी, हिरवी चटणी,
    आणि बारीक शेव घालावी.

  6. 6

    तयार शेवपुरी लगेच सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes