वालाच बिरडं (valach birda recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#KS1
कोकण म्हटलं की तेथील विविध पदार्थांची आठवण होते,असाच एक पारंपारीक पदार्थ म्हणजे वालाच बिरडं किंवा उसळ......
यात ही अनेक पद्धती आहेत नारळाचे दुध घालुन,ओल्या खोबर्याचे वाटण करुन ईत्यादी...
अण मी चिंच गुळ घालुन केले आहे......खुप स्वादिष्ट होते,करुन बघा तुम्ही पण....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमवाल
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1/4 वाटीचिंचेचा कोळ
  5. 2 चमचेतिखट
  6. 1.5 टीस्पून कांदा लसुण मसाला
  7. 1/4 चमचाहळद
  8. 1/2 चमचाराई
  9. मीठ चविनुसार
  10. गुळ चविनुसार
  11. तेल

कुकिंग सूचना

25मिनीट
  1. 1

    प्रथम वाल सकाळी भिजवुन त्याला रात्री पाण्यातुन उपसुन मग कपड्यात बांधुन रात्रभर ठेवुन मोड आणावे.आणि सकाळी सोलुन घ्यावे.

  2. 2

    कांदा,टोमॅटो चिरुन घ्या.

  3. 3

    मग कढईत तेल गरम करुन त्यात राई घाला,तडतडली की कांदा छान गुलाबीसर परतुन घ्या.मग टोमॅटो घाला,परता.

  4. 4

    मग हळद,तिखट,कांदालसुण मसाला घालुन छान फोडणी करुन परता,मग यात वाल घाला,आवश्यकतेनुसार पाणी घाला,चिंचेचा कोळ घाला,चविनुसार मीठ,गुळ घाला,वर झाकणी ठेवुन वाल शिजु द्या.

  5. 5

    आता दहा पंधरा मिनिटांनंतर वालाच बिरडं रेडी आहे,मस्त कोकण स्टाईलने मउसुत पांढर्या शुभ्र तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes