पाया सूप (papaya soup recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

ही माझ्या सासूबाई नी शिकवलेली रेसिपी आहे . लग्ना आधी मी कधीच पाया सूप बनवला नव्हता .

पाया सूप (papaya soup recipe in marathi)

ही माझ्या सासूबाई नी शिकवलेली रेसिपी आहे . लग्ना आधी मी कधीच पाया सूप बनवला नव्हता .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
4 लोक
  1. 1 डझनबोकडाचे पाय
  2. आवश्यकता नुसार पाणी
  3. 3कांदे
  4. 3टोमॅटो
  5. 1/2 वाटी सुके खोबरे
  6. 2-3 तेज पत्ता
  7. 3 हिरवी वेलची
  8. 3-4 लवंग
  9. 1 तुकडादालचिनी
  10. 1/2 टीस्पून हळद
  11. 2 टेबलस्पून धने पावडर
  12. 2 टेबलस्पून लाल तिखट
  13. चिरलेली कोथिंबीर
  14. 2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट
  15. 1/2 टेबलस्पून मटण मसाला
  16. 3पळी तेल

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    बोकडा चे पाय स्वच्छ धुवून घ्यावे.एका कुकर मध्ये एक पळी तेल गरम करून त्यामध्ये तेज पत्ता,दालचिनी,लवंग,हिरवी वेलची याची फोडणी द्यावी व चिरलेला कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यावा व त्यामध्ये हळद,धने पूड,मीठ व एक चमचा आले लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे.

  2. 2

    हा मसाला परतून झाल्या नंतर यात पाय टाकावे व वाफेवर कुकर वर झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवावे अशाने ओशाट वास येत नाही. या नंतर यामध्ये गरजे नुसार पाणी व चिरलेली कोथिंबीर टाकून कुकर चे झाकण लावावे व सात ते आठ शिट्ट्या होऊ द्याव्या. व कुकर थंड करायला ठेवून द्यावा.

  3. 3

    खोबऱ्याचे मिक्सर मध्ये बारीक वाटण करून घ्यावे. व टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. व त्याच सोबत एक चमचा आले लसूण ची पेस्ट घ्यावी. व त्यासोबत अर्धा चमचा लाल मिरची पावडर, व अर्धा चमचा मटण मसाला घ्यावा

  4. 4

    एका मोठ्या पातेल्यात दोन पळी तेल गरम करून त्यामध्ये खोबऱ्याचे वाटण टाकून चांगले भाजून घ्यावे. व त्यामध्ये टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट टाकून चांगले शिजवावे. व त्यामध्ये हळद,लाल तिखट,मटण मसाला टाकून थोड्या श्या पाण्याच्या साहाय्याने तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावे.

  5. 5

    त्यानंतर यामध्ये शिजवलेले पाय टाकावे. व गरजेनुसार पाणी टाकून वरतून चिरलेली कोथिंबीर टाकावी व खाण्यासाठी द्यावे.हा सूप जास्त तिखट करू नका.अंदाजे मसाला टाका.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes