कोफ्ताकरी रेसिपी चे मुख्य फोटो

कोफ्ताकरी

Vaishali Dangat
Vaishali Dangat @cook_20342689

#कोफ्ताकरी


सँलडसाठी हौसेने आणलेला जांभळा कोबी, आपण कितीही निगुतीनं ते सँलड बनवलं तरी कसंबसं चाखत माखत , हळूच आपल्या कडे तिरक्या नजरेनी बघत बघत नाईलाज झाल्यासारखं संपवतात 🙄, आणि फ्रिज उघडला की आधी हाच देखणा गड्डा डोळयासमोर यायचा म्हणलं हा जांभळ्याचा काळानीळा व्हायच्या आत काहीतरी करायला हवं. मग काढला बाहेर वरचे दोन थर काढले बाजूला आणि बारीक किसून घेतला यात चण्याचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ घातलं, जीरे आलं लसूण कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या याची पेस्ट करून यात मिसळली, थोडी हळद, लाल तिखट, धनेजीरे पूड, थोडा हिंग व चवीनुसार मीठ व थोडी साखर घालून कोबीला जे पाणी सुटतं त्यातच मळून घेतलं व याचे गोळे बनवून तळून काढले. ग्रेव्ही साठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो, दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून , ५/६ लसूण पाकळ्या व ७/८ काजू हे सर्व थोड्याशा तेलात परतून घेतले व थंड झाल्यावर याची पेस्ट बनवली. ही पेस्ट तेलात परतून यात थोडी हळद, लाल तिखट, किचनकिंग मसाला , चवीनुसार मीठ , चवीला थोडी साखर व अंदाजाने पाणी घालून उकळी आल्यावर यात तळलेले गोळे/कोफ्ते सोडले व ७/८ मिनिटं झाकण ठेवून वाफवले नंतर यात थोडी साय घातली व एक वाफ आणली मस्त कोफ्ताकरी तयार .

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 200 ग्रँमजांभळा कोबी
  2. 125 ग्रँमचणापीठ
  3. 75 ग्रँमतांदूळ पीठ
  4. 1 टेबल स्पूनलाल तिखट
  5. 1 टेबल स्पूनधनेजीरे पावडर
  6. 1 टी स्पूनहळद
  7. 2 टेबल स्पूनमीठ
  8. 2हिरव्या मिरच्या
  9. 15/16पाकळ्या लसूण
  10. कोथिंबीर
  11. आलं
  12. 1 टी स्पूनजीरे
  13. 1 टी स्पूनओवा
  14. 1मध्यम आकाराचा टोमॅटो
  15. 2मध्यम आकाराचे कांदे
  16. 8काजू
  17. 2 टेबल स्पूनसाखर

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2
  3. 3

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Vaishali Dangat
Vaishali Dangat @cook_20342689
रोजी

Similar Recipes