फरसबीची तमिळ भाजी (farsabichi tamil bhaji recipe in marathi)

Meghana Bhuskute
Meghana Bhuskute @M_Bhuskute_2021

सिंगापूरचं स्ट्रीट फूड प्रसिद्ध. बदक, कोंबडी, बकरा, गाय.. असं कायकाय खाल्लं होतं चिकार. आठवड्याभरानं भारतीय अन्नाची तहान लागली. 'ज्युनिअर कुप्पन्ना' नामक एक रेस्टॉरन्ट दिसलं माध्यान्ही गर्दीनं ओसंडताना. शिरलो. केळीचं आडवं पान. खोबरेल तेलात शिजवलेल्या भाज्या, चमचमीत चटण्या, मसालेदार आमट्या, भातावर तुपाची धार... तृप्त झालो. सिंगापुरी चलन झाडून संपवलं नि मग विमानतळावर गेलो. तिथली ही भाजी. नंतर हुडकून मी पाकृ मिळवली. जमली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटं
४ जण
  1. पाव किलो फरसबी
  2. 1 वाटीखवलेला नारळ
  3. 2 कांदे
  4. 1 बटाटा
  5. 4 हिरव्या मिरच्या
  6. पेरभर आलं
  7. कढीपत्त्याची दहाबारा पानं
  8. मूठभर उडीद डाळ
  9. 4-5 टेबलस्पून खोबरेल
  10. 1 टीस्पूनमोहरी,
  11. हिंग,
  12. मीठ
  13. 1/2 वाटी काजू

कुकिंग सूचना

२० मिनिटं
  1. 1

    काजू अर्धा तास आधी भिजत घालायचे. फरसबी बारीक चिरून, कांदा पातळ उभा चिरून, बटाट्याचे पेराएवढाले तुकडे करून, आलं बारीक उभ्या सळयांसारखं चिरून, मिरच्या उभ्या कापून, नारळ खवून घ्यायचा.

  2. 2

    खोबरेल तेल तापवून उडीद डाळ लाल करून घ्यायची. त्यात मोहरी, हिंग, मिरच्या, आलं, कढीपत्ता, काजू घालायचे.

  3. 3

    त्यावर कांदा, बटाटा, फरसबी, मीठ घालायचं. मंद आच करून, झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजत ठेवायची.

  4. 4

    पाचेक मिनिटांनी झाकण काढून आसडून घ्यायची. वरून ओला नारळ शिवरायचा. त्यानं भाजी किंचित कोरडी होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meghana Bhuskute
Meghana Bhuskute @M_Bhuskute_2021
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes