फ्लेवर्ड नानकटाई (nankhatai recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#नानकटाई #सप्टेंबर
#week4 (रसमलाई, चॉकलेट, ऑरेंज, काजू आणि पिस्ता)
आजची ही माझी १११ वी रेसिपी.कुकपॅड समुहात आले आणि बघता बघता १११ रेसिपींचा टप्पा कधी पार झाला ते कळले देखील नाही.अजून बराच टप्पा गाठायचा आहे आणि त्यासाठी माझ्या बरोबर कुकपॅड चा प्लेटफोम व माझ्या सुगरण मैत्रीणींची मोलाची साथ आहेच सोबतीला.
फारसी शब्द नान म्हणजे रोटी व अफगाणी शब्द खटाई म्हणजे बिस्कीट ह्या दोन शब्दांवरून नानकटाई शब्द तयार झाला .भारतात नानकटाई  ची सुरुवात सुरत येथे झाली. अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते जसे नानकटाई,नानखटाई, अफगाणिस्तान येथे कुल्चाये खताई वगेरे.

नानकटाई साठी गव्हाचेपीठ,मैदा, बेसन,रवा,तूप व साखर हे मुख्य घटकांचा वापर करून तयार केला जाणारा पदार्थ.लहान मुलांच्या आवडीचे हे बिस्कीट अगदी तोंडात ठेवताच विरघळणारी नानकटाई घरी पण अगदी छान होते.

आज मी ही फ्लेवर्ड नानकटाई तयार करण्यासाठी , कोको पावडर,केशर,ऑरेंज अक्षरशः,पिस्ता पावडर व इम्लशन चा वापर केला आहे.ज्याने नुसता चे रंगच नाही पण चव पण छान आली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिनिटे
  1. १ कप गव्हाचे पीठ
  2. 1 कपमैदा
  3. 1/2 कपबेसन
  4. 1/2 कपबारीक रवा
  5. 2 टेबलस्पूनवेलची पूड
  6. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. १ आणि १/२ कप साजूक तूप
  8. १ आणि १/४ कप पीठी साखर
  9. पिस्ता फ्लेवरसाठी
  10. 2 टेबलस्पूनपिस्ता पावडर
  11. 1टिस्पून पिस्ता इम्लशन
  12. चॉकलेट फ्लेवरसाठी
  13. 1 टेबलस्पूनकोको पावडर
  14. रसमलाई फ्लेवरसाठी
  15. 2 टेबलस्पूनदूध
  16. ८-१० केशर काड्या
  17. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  18. 1 टीस्पूनरसमलाई इसेन्स
  19. काजू फ्लेवरसाठी
  20. १५-२० काजू ची पावडर
  21. ऑरेंज फ्लेवरसाठी
  22. 1/4 टीस्पूनऑरेंज इम्लशन
  23. 1 टेबलस्पूनऑरेंज क्रश

कुकिंग सूचना

६० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम नानकटाई चार मेन बेस करण्यासाठी तूप हेंडमिकसरे चांगले पांढरे होई पर्यंत फेसून घ्या.आता त्यात पीठी साखर घालून पुन्हा ८-१० मिनिटे फेटून घ्या.(जेवढे हे मिश्रण फेटून हलके होईल तेवढी आपली नानकटाई छान होईल)

  2. 2

    गव्हाचेपीठ व मैदा चाळून एकत्र करून घ्या आणि थोडा थोडा करून तूप आणि पिठीसाखरेच्या मिश्रणात मिक्स करून घ्या

  3. 3

    आता बेसन, रवा आणि वेलचीपूड घालून हाताने मिक्स करून गोळा तयार करावा घ्या.

  4. 4

    तयार मिश्रणाचे पाच सारखे भाग करून त्यात फ्लेवर चे सांगितल्या प्रमाणेच साहित्य घालून मिक्स करावे.

  5. 5

    तयार झालेल्या गोळ्यांचे छोटे सारखे डोळे करून त्याला पेढ्यां सारखे छोटे गोल करून हाताने दाबून घ्या बोटाने दाबून त्यात पिस्ता,बदाम किंवा काजू लावा व ट्रे मध्ये बटर पेपर ठेवून त्या वर तयार केलेल्या नानकटाई थोड्या थोड्या अंतरावर ठेवा.

  6. 6

    OTG मध्ये १८०°टेंम्परेचर ठेवून २०ते२५ मिनिटे नानकटाई बेक करुन घ्या.थंड झाल्यावर अनमोल्ड करा.

  7. 7

    कुकर मध्ये नानकटाई बेक करण्यासाठी कुकर चर्या तळाला मीठ घाला त्यावर वायर रेक किंवा स्टेन्ड ठेवून त्यावर नानकटाई चा ठरले ठेवून द्या व कुकरघ्या झाकणाची रींग व शिट्टी काढून टाका.१५-२० मिनिटांनी चेक करा.ठंड झाल्यावर नानकटाई काढून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes