कापसा सारखे मऊ लुसलुशीत दही वडे (dahi vade recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week25
#dahiwade
आता उन्हाळा आला आहे व घरातील मंडळी ला सारखी सारखी भूक लागते, त्यासाठी रोज काय करावं हा प्रश्न असतो. पण उन्हाळ्यात पोटाला थंड व जिभेचे चोचले पुरवणारे घरच्या घरी आपण छान दहीवडे करू शकतो सगळ्यांची भूक तर क्षमतेच पण पोटाला थंडावा पण मिळू शकतो चला तर आज बघूया कापसा सारखे मऊ माऊ लुसलुशीत दही वड्यांची रेसिपी

कापसा सारखे मऊ लुसलुशीत दही वडे (dahi vade recipe in marathi)

#GA4
#week25
#dahiwade
आता उन्हाळा आला आहे व घरातील मंडळी ला सारखी सारखी भूक लागते, त्यासाठी रोज काय करावं हा प्रश्न असतो. पण उन्हाळ्यात पोटाला थंड व जिभेचे चोचले पुरवणारे घरच्या घरी आपण छान दहीवडे करू शकतो सगळ्यांची भूक तर क्षमतेच पण पोटाला थंडावा पण मिळू शकतो चला तर आज बघूया कापसा सारखे मऊ माऊ लुसलुशीत दही वड्यांची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
४व्यक्ती
  1. 100 ग्रॅमउडदाचा सोला
  2. 2हिरवी मिरची
  3. 4 टेबलस्पूनकोथिंबीर
  4. चिमुटभरहिंग
  5. 1/2 लिटरगोड दही
  6. मीठ चवीनुसार
  7. 1 टेबलस्पूनजीरे पूड
  8. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  10. तळण्याकरता तेल
  11. 1 टेबलस्पूनपिठीसाखर

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    गोड दही_ शक्यतोवर घरी बनवलेले फ्रेश दही घ्यावे. दही आंबट नको. त्यात एक टेबलस्पून पिठी साखर घालावी व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे त्यानंतर मोठ्या गाळणीने ते दही गाळून घ्यावे म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत त्यात चवीनुसार मीठ,वाटलेली हिरवी मिरची व कोथिंबीर घालावी

  2. 2

    कोमट पाण्यात चिमुटभर हिंग व चिमूटभर मीठ घालून ते पाणी बाजूला ठेवावं

  3. 3

    दीड वाटी किंवा 100 ग्रॅम उडदाची डाळ स्वच्छ धुऊन चार ते पाच तास भिजत घालावी भिजून झाल्यानंतर वाटावयास घ्यावी

  4. 4

    एक ते दोन टेबलस्पून पाणी घालून उडदाच्या डाळीची एकदम मऊसुत पेस्ट बनवावी,चवीनुसार मीठ घालावे व हाताने किंवा चमच्याने एकाच डायरेक्शन ने दहा मिनिट पर्यंत ते ब्याटर फ्लफी होईपर्यंत व त्यात हवा भरल्या जाईपर्यंत एक सारखं फेटावे. म्हणजे ते बॅटर छान फुलून वर येईल

  5. 5

    एका कढईमध्ये मध्यम आचेवर तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. एका भांड्यात साधं पाणी घेऊन पाण्यात हात बुडवून बुडवून एक एक वडा तापलेल्या तेलात सोडावा. तेल मध्यम आचेवरच गरम असावे म्हणजे वडा आतून छान तळल्या जातो, अधून-मधून वड्यावर झाऱ्या ने तेल ओतावे सोनेरी रंग येईपर्यंत वडे छान तळून घ्यावे

  6. 6

    सोनेरी रंगावर वडे तळून झाल्यानंतर बाजूला काढून ठेवलेले हिंग आणि मिठाच्या पाण्यात ते वडे घालावे व पंधरा मिनिट पर्यंत झाकून ठेवावे.पंधरा मिन. नंतर वडा दोन हातांच्या मध्ये हलक्या हाताने दाबून घ्यायचा व सर्व वडे सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्यायचे

  7. 7

    वडे सर्व्हिंग प्लेटमध्ये काढल्यानंतर सर्व वड्यांवर, वडे बुडेपर्यंत तयार केलेले गोड दही घालावे. यावर हिरवी चटणी, चिंच गुळाची आंबट गोड चटणी, जिरेपूड, चाट मसाला व कोथिंबीर घालावी. हे वडे अगदी मऊसूत,लुसलुशीत व चवदार होतात त्यामध्ये चमचा अगदी अलगत घुसल्या जातो व तोंडात टाकल्या टाकल्या ते विरघळून जातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes